👁 6 Views

औद्योगिक पर्यटनाशिवाय विकास अशक्य- चंद्रकांत लोंढे

पंढरपूर सिंहगड मध्ये उद्योजकता प्रशिक्षण या विषयावर व्याख्यान

पंढरपूर: 

वाढती लोकसंख्या लक्षात घेता उद्योजकांना संधी कमी होत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकता आत्मसात करणे आवश्यक आहे.  उद्योज क्षेत्रातील करिअरसाठी शासनाकडून अनेक अर्थ सहाय्य देण्यात येत आहे. सिव्हिल इंजिनिअर ची गरज समाजाच्या प्रत्येक अंगात आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. जोपर्यंत आपण औद्योगिक पर्यटन करत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. असे मत पुणे येथील मुख्य उद्योजकता प्रशिक्षक मिटकाॅनचे चंद्रकांत लोंढे यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये बोलताना व्यक्त केले. 


एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात सोमवार दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता आणि शासकीय योजना या विषयावर चंद्रकांत लोंढे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


   या व्याख्यानाचे  सुरुवात मुख्य उद्योजकता प्रशिक्षक मिटकाॅन पुणे येथील चंद्रकांत लोंढे, डाॅ. चेतन पिसे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. यशवंत पवार आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


   यादरम्यान चंद्रकांत लोंढे यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

  यावेळेस उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.


  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रियंका चव्हाण, गौरी मंगळुरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील प्रा. गणेश लकडे, प्रा. यशवंत पवार, प्रा. अजित करांडे, प्रा. अमोल कांबळे, प्रा. निखत खान, प्रा. सुजित राठोड, प्रा. शेखर पाटील, दत्तात्रय नवले, सुर्यकांत जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *