👁 11 Views

माढ्यात नराधम बापाचे स्वतःच्याच मुलीवर दुष्कर्म… कुकर्मा बाप गजाआड

जन्मदात्या बापानेच ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याची घटना माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. या प्रकरणात अल्पवयीन पिडीत मुलीच्या आईने माढा पोलिसांत आपल्या पती विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात बलात्कार व पाॅक्सो कलमातंर्गत सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.




फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपी पती गत दोन वर्षापासुन आपल्या मुलीवर दुष्कर्म करीत आला असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. दिनांक २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान घरी कोणी नसताना तसेच घरातील मंडळी रात्री झोपल्यानंतर आपल्या मुलीचे तोंड दाबून वेळोवेळी तिच्यावर दुष्कर्म केल्याचं आरोपीच्या पत्नीने फिर्यादीत म्हटलं आहे.

तसेच या प्रकराबाबत कोणालाही काही सांगितलं तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी ही धमकी पती देत असल्याचे सुद्धा फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान माढा पोलिसांनी या नराधम पित्याला अटक करुन ताब्यात घेतले आहे. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रकिया सुरु आहे. नाते संबधातच असलेली ही घटना पोलिसांत दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोगडे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *