👁 9 Views

पंढरपूर- सातारा महामार्गावरील वाहतुक मार्गात बदल

Pandharpur Live-

  पंढरपूर, दि. 05 :-  पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील पंढरपूर तालुक्यातील सुपली  येथील उजनी कॅनॉलवरील कोसळलेल्या पुलाचे बांधकाम नव्याने सुरु असल्याने या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल दिनांक  3 मार्च  ते 15 एप्रिल 2020  कालावधी पर्यंत राहणार आहे. अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.



पंढरपूर- सातारा  राष्ट्रीय महामार्गावरील सुपली गावच्या हद्दीतील उजनी कॅनॉलवरील पुलावरील वाहतुकीसाठी कोणताही अडथळा होऊ नये यासाठी अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

पंढरपूर कडून साताराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना सूचना:-  पंढरपूर कडून  साताराकडे जाणारी अवजड वाहने गादेगांव येथून  कोर्टी मार्गे पंढरपूर-कराड रस्त्यावरुन उजवीकडे वळून महुद मार्गे साळमुख येथून साताराकडे मार्गस्थ करावीत अथवा गादेगांव मार्गे बाजीराव विहीर येथून पंढरपूर- पुणे  मार्गावरुन वेळापूर चौकातुन साळमुख मार्गे साताराकडे मार्गस्थ करावीत.

सातारा कडून पंढरपूरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना सूचना:-  सातारा  कडून  पंढरपूरकडे  जाणारी अवजड वाहने  साळमुख येथून महुद मार्गे पंढरपूर- कराड रस्त्यावरुन  कोर्टी -गादेगांव  मार्गे पंढरपूरकडे  मार्गस्थ करावीत. अथवा साळमुख येथून वेळापूर मार्गे पंढरपूर-पुणे रस्त्यावरुन पंढरपूरकडे मार्गस्थ करावीत.
संबंधीत वाहनधरकांनी या बदललेल्या वाहतुक मार्गाची नोंद घेवून वाहतक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन वाहतुक विभागाच्या वतीने करण्यात  आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *