पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन– चीनमधुन आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर निर्माण केला असुन इटलीमध्ये 24 तासांत तब्बल 475 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 170 देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असून, बुधवारपर्यंत मृतांची संख्या 8790 वर गेली आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता 170 देशांमध्ये पसरला आहे.
- आतापर्यंत चीनमध्ये सर्वाधिक 3267 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इटलीमध्ये 2978 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत तब्बल 475 जणांचा बळी गेला. स्पेनमध्ये 623, फ्रान्स 175, अमेरिका 116, ब्रिटनमध्ये 71 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये मृतांची संख्या 1135 वर गेली आहे.
- कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू युरोपात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
- जगभरात 24 तासांत 78766 नवीन रुग्ण दाखल झाले. त्यातील 6434 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यात युरोपातील संख्या जास्त आहे.
- इटली, स्पेन, फ्रान्ससह संपूर्ण युरोपातील 27 देश शटडाऊन केले गेले आहेत.

