👁 9 Views

‘आम्ही जगावं कसं व सरकार’ कोरोना च्या पार्श्‍वभुमीवर गायक आनंद शिंदे यांचे नवीन गीत कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स यांना समर्पित…



मुंबई / सोलापूर. ( शाहरुख मुलाणी ) – आम्ही जगावं कसं व सरकार या गीत मधून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्या व्यथा सांगणारे गाणे हे सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावतुन समर्पित केले आहे. सदर गीत  सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

यावेळी सुप्रसिद्ध गायक शिंदे म्हणाले की, आज कोरोना विषाणू ने संपूर्ण जगात, देशात तसेच राज्यात थैमान घातले आहे. यात लॉकडाऊन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कलम 144 अन्वये संचारबंदी कर्फ्यु लागू केले आहे. त्यामुळे सैनिक तसेच गृह विभागाचे पोलीस, होमगार्ड कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास डोळ्यात तेल ओतून ड्युटी बजावत आहेत. तसेच प्रामुख्याने म्हणजे कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांना कोरोना च्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, नर्स अहोरात्र  क्योरनटाइन कक्ष, विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) मध्ये मेहनत घेत आहेत. तर दुसरी कडे सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी शहरचा शहर, नगरे, गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करत आहेत.



तसेच लॉकडाऊन मुळे लावणी, भारूड, वग, लोकसंगित, तमाशा, जागरण गोंधळ व ढोल लेझीम, बॅन्जो पथक अशा कित्येक प्रकारतुन हे कलाकार आपली लोककला सादर करून आपला उदरनिर्वाह करित असतात. चैत्र महिनापासुन महाराष्ट्रातील अनेक गावाच्या जत्रा व यात्रांना सुरवात होत असते. शिवजयंती, आंबेडकर जयंती, लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रमात या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते व यातुन मिळणाऱ्या मानधनावर यांचा कुटुबांचा उदरनिर्वाह चालतो. अशा सर्व कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स, महानगरपालिका कर्मचारी यांना सर्वांना आम्ही जगावं कसं व सरकार या गीत मधून  स्व. प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी सुप्रसिद्ध गायक आनंद प्रल्हाद शिंदे (शिंदे परिवार) यांनी आपल्या भावना समर्पित केल्या आहेत.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *