पंढरपूर लाईव्ह- पांडुरंगा सर्व कोरोना विषाणुचा नायनाट करण्याची ताकद तुझ्यातच आहे… अवघ्या महाराष्ट्राची तुझ्यावर नितांत श्रध्दा आहे. अवघ्या महाराष्ट्रातील सर्व जनता तुझ्याकडं मोठ्या आशेनं पहात आहे. आज संत नामदेव महाराज व संत चोखामेळा यांच्या समाधी स्थानाचं दर्शन घेवुन या संतांमार्फत कोरोना विषाणुचं आलेलं संकट परतवण्यासाठी वरीलप्रमाणे पांडुरंगाला साकडं घातलं, हे साकडं पांडुरंगापर्यंत नक्कीच पोहोचेल व कोरोना विषाणुचं संकट लवकर दुर होईल. असं मत सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
सोलापूरचे पालकमंत्री झाल्यानंर आज प्रथमच ते सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. पंढरीत आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर श्रीविठ्ठल रुक्मिणी चे दर्शन बंद असल्यामुळे त्यांनी महाद्वारातील श्रीसंत नामदेव महाराज व श्रीसंत चोखामेळा महाराजांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेतले.
पोलीसांनी कुठेही सोशल डिस्टक्शन मध्ये कमीपणा येवु देवु नये.गावात कुणाही तिर्हाईतांनी प्रवेश केला तर त्याबाबत तात्काळ पोलीसांना कळवावं, आपला जवळचा नातेवाईक असेल तरी कळवावं. हा रोग पसरु नये म्हणुन जे जे करता येईल ते करावं, आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात याचा शिरकाव अद्याप झाला नाही, तो होवु नये याची दक्षता घ्यावी. असे आवाहन यावेळी त्यांनी केलं.

