Pandharpur Live Online- दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातच्या मरकजला उपस्थित राहिलेल्या लोकांनी देशभरात कोरोना पसरवल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत एक आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 30 टक्के रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. देशात सध्या कोरोनाचे 2902 रुग्ण असून त्यापैकी 1023 रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
शनिवारी तबलीगी जमातशी संबंधित 17 रुग्ण सापडले असून यांची संख्या 1023 झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली.
तबलीगी जमातशी संबंधित प्रकरणे तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, जम्मू काश्मीर, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार, उत्तराखंड, हिमाचल, झारखंड या 17 राज्यांमधून समोर आली आहेत. तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या 23 हजार लोकांना अलग ठेवण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत भारतात कोरोनाचे 2,902 रुग्ण आढळले आहेत. कालपासून 601 पॉझिटिव्ह रूग्ण नोंदवले गेले आहेत, तर काल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृत्यूची संख्या 68 वर पोहोचली आहे.
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचे वयोगट –
दरम्यान, रुग्णांच्या वयाबद्दल माहिती देताना आरोग्य सचिवांनी सांगितले, ‘कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्यांपैकी नऊ टक्के रुग्ण 0-20 वयोगटातील आहेत, 42 टक्के रुग्ण 21-40 वयोगटातील आहेत, 33 टक्के रुग्ण 41-60 वयोगटातील आणि 17 टक्के रुग्ण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
देशात सध्या कोरोनाचे 2902 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात देशातील रुग्णांचा आकडा अचानक वाढला असून 601 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 68 झाला आहे, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले. 183 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तबलीगी जमातच्या संपर्कात आलेल्या 22 हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
रुग्णांचे वय आणि टक्केवारी
0 ते 20 वय – 9 टक्के
21 ते 40 वय – 41 टक्के
41 ते 60 वय – 33 टक्के
60 वयापेक्षा जास्त – 17 टक्के


