👁 13 Views

विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यााना तीन महिन्यांचे अनुदान एकाच वेळी देणार… जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

          सोलापूर दि. 28 : जिल्ह्यातील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जूनचे अनुदान  एकाचवेळी  देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाने निर्णय  घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.

          जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना.  दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या केंद्र पुरस्कर योजना आहेत.  तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या राज्यपुरस्कर आहेत. या पाच योजनेचे जिल्ह्यात एकूण एक लाख 43 हजार 324 लाभार्थ्यांना लाभ मिळेल.  हे अनुदान आठवडाभरात खात्यावर देण्याचे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

          केंद्र पुरस्कृत वृध्दापकाळ योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना आणि दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्याना नियमित अनुदानासोबतच एप्रिल आणि मे महिन्यांसाठी प्रत्येकी पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वाटपासाठी एकूण 49.51 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदरचे अनुदार जिल्ह्यातील अकरा तालुके आणि सोलापूर शहर यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर आठवडाभरात अनुदान वर्ग होईल, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
          सदरची अनुदानाची रक्कम खात्यावरुन परत जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी खात्यामधून रक्कम सोयीनुसार काढावी. रक्क्म काढण्यास बँकेत गर्दी करु नये, असे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले आहे.

          केंद्र पुरस्कृत योजनेचे लाभार्थी   – 34095

          संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी   – 56368          श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थी   – 86956          केंद्र सरकारकडून प्राप्त रक्कम   – 5.60 कोटी रुपये          राज्य शासनाकडून प्राप्त रक्क्म  – 43.91 कोटी रुपये

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *