पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन – प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू असतांनाच छगन चौगुले यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली…काल बाई सुपारी फुटली’ या गाण्याने छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली. याच बरोबर छगन चौगुले यांनी ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ यासारखे अनेक कार्यक्रम सादर केले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अॅन्ड्रॉईड अॅप-
DVP MART
या कार्यक्रमाच्या सीडीज तर विशेष गाजल्या तर छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते गायली आहेत.
छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली ती ‘खंडेरायाच्या बानू लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली’ या गाण्याने. आजही अनेक टीव्ही शो, शाळा महाविद्यालयांचे युवा महोत्सव आणि विविध कार्यक्रमात ‘नवरी नटली’ हे गाणे वाजवले जाते. त्यांना २०१८ साली लावणी गौरव पुरस्कार मिळाला होता.
‘मांढरदेवी काळुबाईची कथा’, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’ हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध होते.

