Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील रूग्णाच्या संपर्कात आलेल्या बार्डी (ता.पंढरपूर) येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता एकुण 7 झाली आहे. करकंब येथील 39 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 38 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पंढरपूर शहरातील आता केवळ तीन व्यक्तींचे रिपोर्ट प्रलंबित आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील ऊपरी येथे प्रत्येकी दोन तर तालुक्यातील करकंब आणि गोपाळपुर येथील प्रत्येकी एक अशा सहा जणांचे रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आले होते. पुण्याहून करकंबला आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील अन्य 39 व्यक्तींचे स्वॉब घेण्यात आले होते.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अॅन्ड्रॉईड अॅप-

