👁 12 Views

जिल्हा स्तरावर बी.एच.एम.एस. डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करावी-डॉ. पल्लवी पाटील

Pandharpur Live-   

पंढरपूर (प्रतिनिधी):- जिल्हास्तरावर  बी.एच.एम.एस. डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणी पंढरपूर येथील डॉ.पल्लवी पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना या मागणीसंदर्भातला ई-मेल त्यांनी नुकताच पाठविला आहे.

   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


बृृहन्मुंबई येथे नुकत्याच वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियुक्या करण्यात आल्या. या धर्तीवर बी.एच.एम.एस. या डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूका कराव्यात. भविष्यात अनेक वैद्यकीय अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची गरज पडू शकते . ऐनवेळी ते उपलब्ध होतीलच असे नाही. सदर गोष्टींचे गांभीर्य पाहता आम्ही स्वईच्छेने वैद्यकीय सेवा करण्यासाठी तयार आहोत. जिल्हास्तरावरुन सदर नेमणुकीची कार्यवाही व्हावी जेणेकरुन सर्व डॉक्टरांना समान न्याय व संधी मिळेल. वरील मागण्यांचा आपत्कालीन काळात पुर्वतयारी या दृष्टीने विचार व्हावा, असे डॉ. पल्लवी पाटील यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.     

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *