Pandharpur Live –
पंढरपूर (प्रतिनिधी )
येथील ओंकार जोशी मित्र मंडळ आणि घोंगडे गल्ली परिवाराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 129 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून या रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला.
शिवराज्याभिषेकदिना निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओंकार जोशी मित्र परिवार आणि घोंगडे गल्ली मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदाऊ शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदरच्या शिबीराचे उद्घाटन अनिल काका बडवे, प्रशांत वांगीकर सर,गोविंदराव भातलवंडे , विनय महाराज बडवे , राजू उराडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
या शिबिरामध्ये १२९ जणांनी रक्तदान करून आपला उस्पूर्त सहभाग नोंदवला.या वेळी 132 वेळा रक्तदान केलेल्या भजनदास लेंगरे याःचा सत्कार करण्यात आला.
सध्या कोरोना या महामारीच्या काळात सर्वाधिक रक्ताची आवश्यकता भासत आहे. यासाठी अनेक रक्तपेढी यांनी रक्त दान करण्याचे आवाहन केले. यातच ओंकार जोशी मित्र परिवाराच्या वतीने तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्यास आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक मास्क आणि सनिटायझर भेट देण्यात आले आहे. याप्रसंगी घोगडे गल्लीतील सर्व सदस्य आणि ओंकार जोशी मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
प्रतिवर्षी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंढरपुरातून असंख्य कार्यकर्ते रायगडावर जात असतात. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक प्रमाणात सुद्धा शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. मात्र यंदा कोरोना या संकटामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने निर्माण झाली. यातच समाजहिताच्या दृष्टीकोनातून रक्तदान शिबिरास सारखा सामाजिक उपक्रम ओंकार जोशी मित्रपरिवाराने हाती घेतला.

