Pandharpur Live Online – ll
पोलिसाच्या माहितीनुसार, विमानतळ भागात बनावट नोटा येणार असल्याची माहिती काल गुन्हे शाखा आणि लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. यावेळी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी नोटा असलेल्या ठिकाणाची माहिती दिली.
या कारवाईत सहा जणांना जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
पोलिस उपआयुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी गुप्तचर यंत्रणेला नोटांची (एमआय) मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेने याबाबतची माहिती गुन्हे शाखेला दिली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. संबंधित सदनिकेत खोली भरून नोटा थप्पी असल्यामुळे रात्री उशीरापर्यत त्या मोजण्याचे काम सुरू होते. घरात नवीन दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा भरलेले बॉक्स खोलीभरून आढळून आले. नोटाबंदीनंतर एक हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली होती. एक हजार रुपयांची बनावट नोट छापण्यामागचा टोळीचा नेमका हेतू काय? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणलेले चलन कोणाला देण्यात येणार होते तसेच बनावट चलनाची छपाई कोठे करण्यात आली, या दृष्टीने चौकशी करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत जप्त करण्यात आलेल्या बनावट चलनाची मोजदाद करण्याचे काम सुरू होते. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

