👁 10 Views

पुढील पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

 छायाचित्रं- संग्रहीत

Pandharpur Live Online- ll

मुंबई – पुढील पाच दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

दोन दिवसांपासून महाराष्ट्रावर ढगांची गर्दी होऊ लागली असून, मान्सननं आस्ते कदम महाराष्ट्रात पाऊल ठेवलं आहे. पुणे वेधशाळेनं याबाबत माहिती दिली आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

मान्सूनचं आगमन झालं आहे. गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा या भागातून मान्सून पुढे सरकत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे, असं पुणे वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.

आजपासून पुढील पाच दिवसात राज्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 12, 13, 14 जून या दिवसात चांगला पाऊस होईल, अशी माहिती कश्यपी यांनी दिली आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *