👁 39 Views

महाराष्ट्राच्या लाडक्या ‘पु.लं.’ना विनम्र अभिवादन…- उपमुख्यमंत्री अजित पवार


Pandharpur Live –

l

 मुंबई दि. ११ :  ‘पु.ल’ स्पर्श होताच, दुःखे पळाली…नवा सूर, आनंदयात्रा मिळाली…निराशेतून माणसे मुक्त झाली…जगू लागली, हास्यगंगेत न्हाली… असं ज्यांचं वर्णन कवीवर्य मंगेश पाडगावकरांनी केलं ते आनंदयात्री पु.ल.देशपांडे अर्थात लाडक्या ‘भाईं’चा आज स्मृतीदिन.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

भाईंनी त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्वानं महाराष्ट्र हसवला, हसता ठेवला अन् घडवला देखिल. भाईंनी साहित्य व कलेच्या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी केली व रसिकांना मनमुराद आनंद दिला. माणुसकीचा आदर्श निर्माण केला. नैतिकता, दातृत्वाच्या बाबतीतही ते श्रेष्ठ ठरले. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्रावर त्यांनी भरभरुनं प्रेम केलं. महाराष्ट्राचा गौरव वाढवला.

 ‘पु.ल.’नी महाराष्ट्र कायम हसता ठेवला, पुढेही ठेवत राहतील. असे ‘पु.ल.’ पुन्हा होणे नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *