👁 9 Views

पोलीसदादा काळजी घ्या… मुंबईत गेल्या 24 तासात 4 पोलिस कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यु

Pandharpur Live online-

मुंबई, 13 जून: पोलिस कर्मचारी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे राहून आपला कर्तव्य पार पाडत आहेत; पण कोरोनाशी लढणाऱ्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यात पोलिस दलातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोरोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील आणखी 4 योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

बोरवली, वाकोला आणि दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये हे कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत होते .मुंबई आतापर्यंत २६ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे .

महाराष्ट्रात मागील दोन दिवसांत १२९ पोलिसांना करणाची लागण झाली आहे .त्यामुळे कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार ३८८ इतकी झाली आहे .आत्तापर्यंत राज्यात ४०पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे .तर ३ हजार पैकी आतापर्यंत १९४५ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे .

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

पोलिस कॉन्स्टेबल संदेश किणी (बोरिवली), हवालदार हेमंत कुंभार (दिंडोशी), हवालदार अनिल कांबळे (वाकोला) आणि एएसआय दीपक लोळे (संरक्षण विभाग) अशी मृत पोलिसांची नाव आहेत. दरम्यान, राज्यात मागील दोन दिवसात 129 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 3388 एवढी झाली आहे. आतापर्यंत 1945 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 40 पोलिसांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *