Pandharpur Live Online-
शनिवारी (ता. १३) मध्यरात्री झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन संशयीत पतीने तिचा खून केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आईच्या कुशीत झोपलेली सहा वर्षांची चिमुरडीही जखमी झाली असून तिच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, नाशिक जिल्ह्यातील जाखोरी इथं शनिवारी 14 जून रोजी ही घटना घडली आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
पतीने इतक्या निर्दयीपणे पत्नीवर कोयत्याने वार केला की, शेजारी झोपलेल्या मुलीलाही त्यामुळे दुखापत झाली, याचे सुद्धा त्याला भान नव्हते. यात सहा वर्षांची चिमुरडी ही गंभीर जखमी झाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलीला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी शिवाजी माळीला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

