👁 9 Views

नात्याला काळीमा- काकुसोबत अनैतिक संबंध… लॉकडाऊनमुळे सतत घरी असलेल्या काकाचा अडसर… पुतण्याकडून काकाचा खुन


Pandharpur Live online-

माणसाला माणसातील विकृती कोणत्या थराला घेवुन जाईल याचा नेम नसतो. कुटुंब हे विश्‍वासावर चालतं, चारित्र्यसंपन्नतेवर व नैतिकतेच्या आधारावर टिकतं. परंतु नैतिकतेच्या सर्व सीमा पार करत काकुचे व पुतण्याचेच सुत जुळले, दोघांच्या अनैतिक संबंधामुळे मात्र काकाला आपला प्राण गमवावा लागला. पती अन् दोन अपत्यांबाबत कोणताही विचार न करता अमरावती येथील एका महिलेने पुतण्याला हाताशी धरले. पुढे जे झालं ते माणुसकीला, नात्याला नक्कीच काळीमा फासणारं होतं. हा खुन करण्यामागे काकु आणि पुतण्याचा वैयक्तिक स्वार्थ होता व तसा कबुलीजबाब सुध्दा दोघांनी पोलिसांना दिला आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
5 जूनच्या रात्रीच्या सुमारास सुकळी रसूलापूर गावात खुनाची ही घटना घडली. खुनाच्या घटनेतील संशयितांना अटक केल्यावर तसेच त्यांच्या कबुलीजबाबानंतर या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले. असे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी सांगितले. गोवर्धन शेषराव मेश्राम (वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आशीष भीमराव मेश्राम (वय 23) हा खूनप्रकरणातील सूत्रधार निघाला. तो मृत गोवर्धनचा पुतण्या आहे.

आशीषचे गोवर्धनच्या घरी काही महिन्यांपासून येणे जाणे वाढले होते. लॉकडाउन सुरू झाले. अन् हाताला काम नसल्यामुळे गोवर्धन अडीच महिन्यांपासून घरीच होता. त्यामुळे गोवर्धनच्या घरी केव्हाही जाणे, आशीषला शक्य नव्हते. भेटीची ओढ, त्यात गोवर्धनचा अडसर, ही बाब आशीषच्या मनात सलत होती. त्याने अखेर काकाचा काटा काढण्याचा प्लॅन रचला.

घटनेच्या दिवशी आशीषने काकाला घरातून बाहेर नेऊन आधी दारू पाजली. आशीषनेही दारू ढोसली. परंतु तो शुद्धीवर होता. त्याने काकाचा खून करण्यासाठी मंगेश अशोक घोडेस्वार, रमेश गंगाराम काळे या दोन मित्रांची मदत घेतली. आशिषने दारूच्या नशेत काकाचा खून केला. त्याच्या मित्रांनी कशाचाही विचार न करता या कामासाठी साथ दिल्याने त्यांच्यावरही गजाआड होण्याची वेळ आली.
पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे खुनाचा तपास जलदगतीने 
नागपुरीगेट पोलिसांनी याप्रकरणी आधी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर घटनेचा उलगडा करण्यासाठी सुकळी रसूलापूर हे गाव गाठले. अन् दुसर्‍या दिवशी पहाटे साडेपाच ते सहा वाजेपर्यंत पुतण्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या कबुलीजबाबानंतर पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी तपासाला गती दिली. अन् तीन दिवसांतच मृत व्यक्तीची पत्नी व आशिषच्या मित्रांनाही अटक केली. आता सर्वच जण न्यायालयीन कोठडीअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात आहेत. पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास जलदगतीने होऊ शकला. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *