Pandharpur Live Online –
मुंबई – “महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर म्हणजे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे.” अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली असून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर महेश तपासे यांनी दिले आहे.
बहुजनांच्या पाठीत खंजीर खुपसणारे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारसाहेबांवर टीका करणे योग्य नाही. आधी बहुजन वर्गासाठी काय केले याचं आत्मपरीक्षण पडळकर यांनी करावे असे आव्हानही महेश तपासे यांनी दिले आहे. सत्तेसाठी धर्मवादी पक्षासोबत गेलात आणि बहुजनांचा विश्वासघात केलात असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
‘श
रद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, ‘अशी टीका बोचरी भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ‘ असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

