Pandharpur Live –
पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी जनतेस रक्तदान करण्याच्या आवाहनानुसार आज पंढरीतील संग्रामसिंह परदेशी मित्र परिवाराने रक्तदान शिबीर आयोजित करून युवकही सामाजिक कार्यात मागे नाहीत हे कृतीतून दाखवून दिले.
संग्रामसिंह परदेशी मित्र मंडळाने आयोजित रक्त दान शिबिराचे उदघाटन करताना “अशा सद्कार्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू आपण असेच चांगले उपक्रम लावावेत अशी अपेक्षा आहे.” असे मत यावेळी माजी आमदार जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनी व्यक्त केले.
या शिबिरासाठी युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेशराव परीचारक, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, कोरोना योद्धा व महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचे नेते अरुणभाऊ कोळी, बालाजीसिंह परदेशी, आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी, भा.ज.पा. चे दशरथ काळे, पत्रकार विवेक बेणारे, समाज भूषण माजी नगरसेवक दत्तासिंह परदेशी, राजाभाऊ अष्टेकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
या शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन रक्तदान केले. पंढरपूर ब्लड बँकेचे प्रसाद खाडीलकर यांनी या शिबिरासाठी बहुमोल सहकार्य केले. या शिबिर यशस्वी होण्यासाठी गणेश जपे गुरुजी, शुभम आष्टेकर, सुरेंद्रसिंह परदेशी,अमोल परदेशी ,सूरज भोसले, आनंद भैया देशमुख,युवराज आष्टेकर, सुमंत भोरकर, उदय परदेशी, रोहित इंदापूरकर,आनंद भोसले,शामसिंह परदेशी व मित्र मंडळाने खूप परिश्रम घेतले.


