👁 7 Views

देवदर्शनाहून परतताना भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह ५ ठार…

  

Pandharpur live : सांगली विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ मोटारीला झालेल्या अपघात एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

गाणगापूरला देवाचे दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात शु्क्रवारी (ता. ५) रात्री झाला आहे.

अपघातात चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय 40 रा. जत), नामदेव पुनाप्पा सावंत (वय 65), पदमिनी नामदेव सावंत (वय 60), श्लोक आकाशदिप सावंत (वय 8) मयुरी आकाशदिप सावंत (वय 38, सर्व रा. जत) यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील आजी, आजोबा सून व नातू यांचा अपघाती मृत्यू झाला असून, वरद सावंत (वय दहा वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास सांगलीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील अमृत फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला. स्विफ्ट कारने समोरुन येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने हा अपघात घडला. गाणगापूरला देवाचे दर्शन घेऊन विजयपूरमार्गे जतकडे येत असताना हा अपघात झाला. ज्यात पाच जणांनी आपले प्राण गमावले.

चार जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले आहे . चालक दत्ता हा जखमी होता. त्यास उपचारांसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *