👁 10 Views

माऊलींच्या पादुका घेवुन आलेले शिवशाही एस.टी. चालक तुषार काशिद यांचा जिवा सेनेकडून सत्कार

पंढरपूर (प्रतिनिधी):- यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे भुवैकुंठ पंढरीत भरणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितील आषाढी यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला. परंतु परंपरेनुसार येणार्‍या प्रमुख संतांच्या पालख्या मात्र शिवशाही एस.टी. बसमधुन पंढरीत आणण्यात आल्या. संत श्रीज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुका ज्या शिवशाही एस.टी. बसने आणल्या या गाडीचे सारथ्य करण्याचा सन्मान तुषार काशिद (रा.बारामती) या नाभिक समाज बांधवास मिळाला. यानिमित्त जिवा सेना, महाराष्ट्र या संघटनेकडून त्यांचा सत्कार श्रीविठ्ठलाची प्रतिकृती देऊन करण्यात आला. अशी माहिती जिवा सेना चे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकर (माऊली) चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.   

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
माऊलींच्या चल पादुका ज्या शिवशाही एस.टी. बसमधुन आणल्या या बसचे चालक तुषार काशिद यांनी 5 वर्षापूर्वी राज्य परिवहन महामंडळातील सेवेस प्रारंभ केला. या कालावधीत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे विनाअपघात सेवा केली. आषाढी एकादशी दिवशी नाभिक समाजातील या बांधवास माऊलींची पालखी घेवुन येणार्‍या शिवशाहीचे चालक होता बनण्याचे परमभाग्य लाभले. ही आमच्या समाजासाठी गौरवास्पद बाब आहे. त्यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल आम्ही जीवा सेना या नाभिक समाजाच्या हितासाठी महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या संघटनेच्या वतीने त्यांचा श्रीविठ्ठलाची प्रतिकृती व श्रीफळ देवुन सत्कार केला. असे मत यावेळी बोलताना जिवा सेना चे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकर (माऊली) चव्हाण यांनी व्यक्त केले. 
आपल्या सत्काराला उत्तर देताना तुषार काशिद म्हणाले की, ‘‘ही संधी दिल्याबद्दल आपल्या वरिष्ठांचे आभार व्यक्त केले. महाराष्ट्रात सर्वप्रथम मला आज जीवा सेना या संघटनेकडून सन्मान प्राप्त झाला याबद्दल मी जीवा सेना या संघटनेचे सर्व पदाधिकारी व सोलापूरचे जिल्हाध्यक्ष माऊली चव्हाण यांचे आभार मानतो.’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी बाळासाहेब काळे, सुनील खंडागळे, किरण हिलाल, दत्ता जाधव, आनंद शिंदे आदी उपस्थित होते.        

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *