👁 14 Views

“कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे मध्ये लॉकडाऊन च्या काळात कॅम्पस प्लेसमेंटमधून ८०% विद्यार्थ्यांचे पुणे येथील नामांकीत कंपनीमध्ये सिलेक्शन”

पुणे येथील नामांकित कंपनीसाठी सिलेक्ट झालेले प्लेसमेंटमधील यशस्वी विद्यार्थी.

Pandharpur Live-  श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचालित कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज लॉकडाउन काळामध्ये ऑनलाइन टेस्ट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, झूम क्लाउड यासारखे नवीन तंत्रज्ञान वापरून अभ्यासक्रम पूर्ण केला एवढेच नाही तर नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह चे आयोजन करण्‍यात आले.

पुणे येथील बडवे ऑटो कॉम्पस् चे संचालक श्री पी. वि. देसाई HR Head
यांनी मेकॅनिकल च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा व इंटरव्यूचे आयोजन करून विद्यार्थ्यांची निवड केली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  आ. प्रशांतराव परिचारक ह्यांनी अभिनंदन केले तसेच ट्रेनिंग आणि प्लेसमेंट नी घेतलेल्या ऑनलाइन इंटरव्यू या कौतुकास्पद आहेत असे उदगार काढले.

४५ कंपन्यानी आतापर्यंत कॉलेज ला भेट दिली असून अजून 3 ते ५ कंपन्या भेट देणार असून ८० % विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटझाले आहे- प्राचार्य,डॉ.श्री.एस.पी.पाटील



Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
सदर कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन दिनांक १९ मे २०२० ला झाले होते या मध्ये ३२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये चि.पठाण असद, चि.हुडेकर हणमंत ,चि. जावीर परमेश्वर , चि.ढेंबरे श्रीराम आणि चि.ब्रह्मदेव गोरड यांची निवड झाली आहे. ४५ कंपन्यानी आतापर्यंत कॉलेज ला भेट दिली असून अजून 3 ते ५ कंपन्या भेट देणार असून ८० % विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले आहे.
कमयोगी इंजिनीरिंग कॉलेज मध्ये पार पडलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये बडवे ऑटो कॉम्पस्, पुणे मध्ये पाच विद्यार्थीचे निवड झाल्याची माहिती ट्रैनिंग प्लेसमेंट प्रमुख प्रा. धनंजय शिवपुजे आणि मॅकेनिकल इंजिनीरिंग चे विभाग प्रमुख प्रा. राहुल पांचाळ ह्यांनी दिली.
या कॅम्पस ड्राईव्ह साठी बडवे ऑटो कॉम्पस् चे श्री. पी वि देसाई , रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके ,उपप्राचार्य जे. ल. मुडेगावकर , प्राचार्य . डॉ.एस्.पी. पाटील सर उपस्थित होते. कॅम्पस ड्राईव्ह मुलाखात ही टेलिफोनीक कॉनफरंसींग द्वारे घेण्यात आली . सदर कॅम्पस ड्राईव्ह साठी प्रा. शिंदे एस्.एम. समन्वयक म्हणून काम पहिले .


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *