👁 9 Views

पंढरपूरकर काळजी घ्या… शहरात आढळले 5 नवीन कोरोना बाधीत रूग्ण.. एकुण रूग्णसंख्या 27

Pandharpur Live- आज पंढरीत नवे 5 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.  या रूग्णामध्ये मुळचे करकंब ता. पंढरपूर येथील दोघेजण जे सध्या पंढरीत आहेत.  पंढरपूर शहरातील दोघेजण व  1 रूग्ण सिकंदर टाकळी ता. मोहोळ येथून पंढरीतील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेला. असे हे 5 रूग्ण आहेत. वरील रूग्णांपैकी एक रूग्ण खाजगी लॅबमध्ये तर एक रूग्ण शासकीय कार्यालयात सेवेत होता. त्यामुळे यांच्या संपर्कात अनेकजण आले असण्याची शक्यता आहे. पंढरपूरकरांनी आता योग्य ती खबरदारी व काळजी घेणे अत्यावश्यक आहे. 

आज सकाळी  १२४ पैकी ७७ अहवाल प्राप्त झाले असून यापैकी  ५ positive  ७ poor quality परत सँपल घ्यावे लागणार तर ६५ जणांचे रिपोर्ट  negative आले आहेत. अद्याप ४७ report येणे बाकी आहे. अशी माहिती पंचायत समितीचे पंढरपूर तालुका आरोग्य  अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे. 

आज आढळून आलेल्या  एकूण ५ positive रूग्णांची माहिती. 
१)  संपर्क व्यक्ती नवी पेठ पंढरपूर.
२) पुणे येथे काम करीत असलेला कर्मचारी सध्या पंढरपूरमध्ये मठात अलग आहे.
३)  karkamb येथील, तो पंढरपुरातील शासकीय कार्यालयात कॉम्प्युटर operator होता व तो संपर्क व्यकी आहे.
४) karkamb येथील लक्षणे असलेला परंतु पंढरपूर मधील एका खाजगी लॅब मध्ये कामाला होता.
५) सिकंदर टाकळी  मोहोळ येथील लक्षणे असल्यामुळे पंढरपूर मध्ये उपचारासाठी आला होता. तो संसर्गजन्य रुग्णालय कॉटेज येथे उपचार घेत होता.


सदर 5 रूग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्यात येणार असुन संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येईल. 


पंढरपूर तालुका दिनांक ६ जुलै सकाळी १० वाजता ची स्थिती:-
आज पर्यंत पंढरपूर मधून  ३५ रुग्ण कोरोना positive निघाले आहेत. त्यापैकी ८ बरे झाले असून सद्यस्थितीला एकूण २७ रुग्ण active आहेत.  त्यातील २० रुग्ण कोविड केअर सेंटर वाखरी येथे तर ६ सोलापूर व १ पुणे येथे उपाचार घेत आहेत.





२७ पैकी २ दूरदर्शन मुंबई चे आहेत. ४ निवासी पत्त्यानुसार इतर तालुक्याचे आहेत; परंतु पंढरपूर कनेक्शन आहे. २१ पंढरपूर तालुक्यातील आहेत.  (ग्रामीण ५ शहर १६)


Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *