👁 11 Views

“कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेने केले विद्यार्थ्यांच्या बैठकीसाठी केली एक विद्यार्थी-एक बेंचची व्यवस्था”

कर्मयोगी विद्यानिकेतन येथे एक-विद्यार्थी एक-बेंच व्यवस्थापन

Pandharpur Live-  सध्याच्या Covid-19 बिकट परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे शक्य नाही यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाबरोबरचे नाते दुरावत चालले आहे. तरीही कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये या महामारीचा विचार करून Covid-19 सुरू झाल्या-झाल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, वर्कशीट, व्हिडिओज, पीडीएफ या माध्यमातून ज्ञानदानाचे काम अविरतपणे सुरू आहे. जरी ही शिक्षण प्रक्रिया चालू असली तरी ही शिक्षकांना वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांसमोर शिकवू शकत नाही याची खंत आहे.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
शासनाचा शाळा सुरू करण्याचा जेव्हा निर्णय जाहीर होईल त्याचा विचार करून तसेच प्रशालेची वाढती विद्यार्थी संख्या विचारात घेवून वर्गामध्ये मुलांची बैठक व्यवस्था एक विद्यार्थी-एक बेंच असा तयार करून शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्सचा विचार करुन या बेंचची मांडणी केली आहे. Covid-19 च्या परिस्थितीमध्ये शासनाने शैक्षणिक दृष्टिकोनातून जी काही नियमावली तयार केली त्याची अंमलबजावणी करण्याचे महत्कार्य प्राचार्या सौ.शैला कर्णेकर यांच्या संकल्पनेतून साकार 
करण्यात आले आहे. 

या सर्व संकल्पना पार पाडण्यासाठी प्रशालेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके व सर्व विभागप्रमूख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *