👁 9 Views

पंढरपूर सिंहगडच्या काॅम्प्युटर विभागाचा पालक मेळावा संपन्न

Pandharpur Live- 

पंढरपूर: प्रतिनिधी 


  एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाचा दिनांक ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता ऑनलाइन पद्धतीने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
     पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाचा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना माहिती व्हावी यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पालक मेळावा संपन्न केला. या मेळव्यात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी लाॅकडाऊन कालावधीत महाविद्यालयाने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी  विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी यू ट्यूब, गुगल क्लास रूम, फेसबुक लाईव्ह अशा विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून लेक्चर घेऊन ज्ञानदान करण्याचे उत्कृष्ट पद्धतीने काम केले आहे. काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी नामकीत तज्ञ व्यक्तीचे वेबिनर आयोजित करण्यात आले होते. विभागाचा विद्यापीठात निकाल उत्कृष्ट पद्धतीने लागत आहेत याची माहिती पालकांना  दिली. तसेच आयईआय आणि स्टुडंट असोसिएशन माध्यमातून भविष्यात जास्तीत जास्त अॅक्टिविटी राबवण्यात येणार असुन पालकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली.      काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाच्या वतीने पालक मेळावा आयोजित केल्याबद्दल पालकांनी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कौतक केले.
  या मेळव्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांना विद्यापीठ नियमाने ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम लवकरच सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालय प्रत्यत्न करीत आहे. लाॅकडाऊन कालावधीत  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाने १४ हून अधिक वेबिनर आयोजित केले होते. त्या वेबिनारचा फायदा भविष्यात विद्यार्थ्यांना प्लेसमेन्टसाठी, शासकीय नोकरीत नोकरी मिळवण्यासाठी होईल. चालु शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील विद्यार्थी जगातील नामकीत कंपनीत १४८ हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना नेटवर्क समस्या निर्माण झाल्या वर वेबसाइट वर संबधित विषयाचे लेक्चर अपलोड केलेले विद्याथ्यांनी पाहून अभ्यास करावा. शिवाय पालकांनी आपल्या पाल्याला ऑनलाइन पद्धतीने शिक्षणासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.
या मेळाव्यात सहभागी झालेल्या पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी उत्तर दिले. सहभागी पालकांचे काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी आभार मानले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग  विभागातील प्रा. विरेंद्र धोत्रे, प्रा. अभिजीत राजगुरू यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *