पंढरपूर: प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, पंढरपूर चा १२ वीचा नुकताच जाहिर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवणारे पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल प्रसिद्ध आहे.
कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षाची सी.बी.एस.ई द्वारे घेण्यात आलेल्या परिक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंहगड संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. आशा बोकील, पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कँम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर सह कॅम्पस मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




