👁 9 Views

6 ठिकाणी घरफोड्या करणारे चोरटे गजाआड… आरोपीकडुन 1 लाख 22 हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त …. शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!

लॉकडाऊनमूळे बंदोबस्तात पोलीस व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत पंढरपूर शहरात पाच ठिकाणी व तालुक्यात एका ठिकाणी अशा 6 घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्यांची टोळी गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी आज पंढरपूर शहर पोलिसांनी केलीय. जेरबंद केलेल्या चोरट्यांकडून 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त  केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली. 
    सागर कृष्णात हराळे रा. झाखले ता पन्हाळा जि कोल्हापुर, लखन कालिदास काळे रा जुना कोर्टाच्या पाठीमागे व इतर दोन आरोपींनी  पंढरपूर शहर व तालुक्यात एकुण   तीन  ठिकाणी घरफोडी व दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला आहे.  या आरोपीकडुन  20 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
  शहरातील लोणार गल्ली येथील संदेश नवञे यांच्या घरातील तीन तोळ्याचे सोन्यांचे गंठण चोरलेप्रकरणी सौरभ उर्फ अक्षय कुमार नवञे यास अटक केली आहे. याचबरोबर तिरंगा नगर येथील 65 वर्षीय रंजना संभाजी जाधव यांच्या गळ्यातील गंठण मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांना हिसका मारुन पोबारा केला. याप्रकरणी शंकर उर्फ पप्पु सुळ, दुर्याधन उर्फ बबलु कांतीलाल चोरमले दोघे रा गोंदी ता इंदापुर जि पुणे यांना अटक केली आहे. 
  लॉकडाऊनच्या काळात घरफोडी करणारे चोरट्यांना पोलीसांनी जेरबंद केल्यामुळे नागरिकांमधुन समाधान व्यक्त होत आहे. सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि अरुण पवार, गुन्हे शाखेचे सपोनि नवनाथ  गायकवाड, पोहेका सुजित उबाळे, बिपिनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, गणेश पवार, सतीश चंदनशिवे, मच्छिंद्र राजगे, इरफान शेख, अभिजित कांबळे, शोएब पठाण, प्रसाद औटी, संदिप पाटील, सुजित जाधव, सिध्दनाथ मोरे, संजय गुटाळ, समाधान माने आदींनी केली.  पुढील तपास सपोनि नवनाथ गायकवाड, हवालदार सुजित उबाळे, सुरज हेंबाडे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *