○ ऑनलाईन वेबिनारला ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर: प्रतिनिधी
बारावी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपुढे करिअरच्या बाबतीत अनेक पर्याय उपलब्ध असतात परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे १२ वी सायन्स मध्ये चांगले गुण असुन सुद्धा करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाही. यासाठी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने १२ वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना “इंजिनिअरींग क्षेञात करिअरच्या संधी” या विषयावर प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दि. २२ जुलै २०२० रोजी सकाळी ११: ३० मिनिटांनी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारला ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “इंजिनिअरींग क्षेञात करिअरच्या संधी” या विषयावरील वेबिनार मध्ये प्रा. समीर कटेकर यांनी फेसबुक लाईव्ह व युटूब लाईव्ह च्या माध्यमातून ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या १२ सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच सहभागी झालेल्या पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
या ऑनलाईन वेबिनारमध्ये प्रा. समीर कटेकर यांनी बारावी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग क्षेञात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग, सिव्हिल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतल्यास करिअरच्या पुष्कळ संधी असुन या संधीचा फायदा पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे. महाविद्यालयाच्या विविध विभागातील अनेक विद्यार्थी हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत यश प्राप्त करून शासकीय सेवेत आहेत. याशिवाय महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे जगातील नामांकित कंपनीत तसेच परदेशातील नामांकित कंपनीत नोकरी मिळवून करिअर करीत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी अनेक विद्यार्थी हे इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन उद्योग क्षेत्रात करिअर करीत असल्याची माहिती प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी सहभागी विद्यार्थी व पालकांना पीपीटी द्वारे दिली.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” इंजिनिअरींग क्षेञात करिअरच्या संधी” या विषयावरील वेबिनार व विविध क्षेत्रातील करिअर विषयी माहिती जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाचे फेसबुक पेजवर Sinhgad Institute’s Pandharpur तसेच
https://youtu.be/t0SY8pXew_o या युटूब चॅनल वर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी फेसबुक पेज व युटूब चॅनल वर जाऊन इंजिनिअरींग क्षेञात असलेल्या करिअरच्या संधीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता.
हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत सह अमोल नवले, राजेंद्र राऊत यांनी परिश्रम घेतले.