पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
एखाद्या व्यक्तीला एकदा करोना होऊन तो कोरोनामुक्त झाल्यावर पुन्हा त्यास करोना होतो का? असा प्रश्नही आता अनेकांना पडला आहे. एकदा सर्दी किंवा दुसरा आजार होऊन गेल्यावर पुन्हाही जशी एखाद्या आजार किंवा विषाणूची लागण होऊ शकते, त्याच पद्धतीने दुसऱ्यांंदा कोविड-१९ होऊ शकतो!
होय, असे संशोधक व वैद्यकीय तज्ञांनी स्पष्ट केले आहे. ब्राझिलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांच्यासह अनेकांच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. अमेरिका आणि युरोपात अशी हजारो रुग्णांची उदाहरणे आहेत. याबाबत इकॉनॉमिक टाईम्स या आघाडीच्या वृत्तपत्राने खास न्यूज प्रसिद्ध केली आहे.
त्यात म्हटले आहे की, उलट दुसऱ्यांंदा करोना झाल्यास तो जिवीतास जास्त घातक ठरू शकतो.
त्यामुळे यापुढे मला करोना होऊन गेला म्हणजे मी पुन्हा मला या विषाणूची बाधा होऊच शकत नाही हा भ्रम आहे. हर्ड इम्युनिटीच्या सिद्धांतालाच यामुळे धक्का बसला आहे.

