👁 7 Views

पंढरीत दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त

आज पंढरीतील शिंदे शाही येथे वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  विशेष म्हणजे या कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा  कोरोना रिपोर्टही पॉझिटीव्ह आला होता. आज कोरोनामुक्त झाल्यानंतर ते स्वगृही परतले.  या कुटुंबातील दोघंजण पोलीस खात्यात सेवेत आहेत. 
कुटुंबातील 
श्री. गणेश सावळाराम काळे
सौ.शिल्पा गणेश काळे
सौ.आशा सावळाराम काळे 
यांच्यासह
चि. गिरीश संतोष काळे (वय साडे तीन वर्ष)
चि. अथर्व गणेश काळे (वय अडीच वर्ष) 
या दोन चिमुल्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.  त्यांच्यावर वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये दि. 18 जुलै पासुन उपचार सुरू होते. आज कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 
स्वगृही परतल्यानंतर कुटूंबियांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
या कुटुंबातील संतोष काळे यांनी पंढरपूर लाईव्हशी मोबाईलवरून संपर्क साधत यासंदर्भात अधिक माहिती दिली. वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये मिळालेल्या उपचाराबाबत समाधान व्यक्त करून कोविड सेंटरमधील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी,  अधिकारी व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *