👁 10 Views

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती; 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याची मुदत… प्रधानमंत्री आवास योजनेतील कुटुंबांनी आधार सिडींग करुन घेण्याचे आवाहन


माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती;

15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याची मुदत

 

            सोलापूर,दि.29: जिल्ह्यातील माजी सैनिकयुद्ध विधवामाजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

            माजी सैनिकांचे पाल्य 10 वी12 वीपदविका आणि पदवी अभ्यासक्रमात सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्यांनी कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयसोलापूर यांच्याकडे अर्ज करावेत.

        शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे

1. वैयक्तिक अर्ज

2. शिष्यवृत्तीचा विहित नमुन्यातील अर्ज

3. गुणपत्रिकाची साक्षांकित प्रत

4. इतर कोणतीही शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा/महाविद्यालय प्रमुखाचा दाखला.

5.शिष्यवृत्तीधारक मुलगी 12 वीच्या पुढे शिकत असल्यास अथवा 18 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास अविवाहित असल्याचा ग्रामपंचायतीचा दाखला.

6. माजी सैनिक/विधवा यांच्या ओळखपत्राची प्रत

7. डिसचार्ज बुकची सत्य प्रत. यात पाल्याचे नाव नसल्यास रेकॉर्ड कार्यालयातील डीओ-2 ऑर्डर प्रत.

            ज्या पाल्यांनी सीईटी/जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन पुढील वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहेअशा पाल्यांनी माजी सैनिकांचे गॅप सर्टिफिकेट (स्वयंघोषणापत्र) जोडून शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत.

           

                       

 

 

                                                     000000000


प्रधानमंत्री आवास योजनेतील कुटुंबांनी

आधार सिडींग करुन घेण्याचे आवाहन

 

            सोलापूर,दि.29: प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वेक्षण झालेल्या कुटुंबानी पंधरा वर्षावरील सदस्यांच्या आधार सिडींगचे काम पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी केले आहे.

 

            याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र-ड यादीत समावेश असलेल्या कुटुंबांचे आवास प्लस ॲपद्वारे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेतील आधार सिडींगचे काम गावपातळीवर सुरु आहे. तरी संबंधितांनी सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी तातडीने संपर्क साधून कुटुंबातील पंधरा वर्षावरील सदस्यांची आधार सिडींगचे काम पूर्ण करुन घ्यावे. आधार सिडींग 31 जुलै 2020 पर्यंत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *