👁 10 Views

खासगी दवाखान्यांच्या बिलांचे लेखा परीक्षण काळजीपूर्वक करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूरदि.30खाजगी दवाखान्यांच्या बिलांबाबत सामान्य जनतेच्या तक्रारी येता कामा नयेत. खाजगी दवाखान्यातील बिले शासकीय नियमानुसार आहेत की नाहीतयाचे लेखा परीक्षण काळजीपूर्वक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधितांना दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी दवाखान्यातील बिलाबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुखजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेलेमहापालिकेचे कोविड समन्वयक धनराज पांडे यांच्यासह व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळसर्व प्रांताधिकारीतहसीलदारतालुका आरोग्य अधिकारीलेखा परीक्षक सामील झाले होते.

            श्री. शंभरकर यांनी सांगितले की, ‘लेखा परीक्षकांनी खाजगी दवाखान्यातील बिलांबाबत रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येणार नाहीतयाबाबत काळजी घ्यावी. ऑक्सिजनपीपीई कीट याबाबतीत चार्जेस शासकीय नियमानुसार आहेत कायाची पाहणी करूनच बील देण्यास सांगावे’.

            दवाखान्यांनी कोविड आणि नॉन कोविड बेडची माहिती डॅशबोर्डद्वारे जनतेला समजेल अशा ठिकाणी लावायला हवी. यामध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या बेडची माहितीही द्यायला हवी. 21 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार बील आकारणी होते की नाहीहे काम लेखा परीक्षकांनी संबंधित यंत्रणेशी लक्षात आणून द्यायला हवे. रूग्णांकडून जास्त बील आकारणाऱ्या रूग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना शासनाने सर्वांना लागू केली आहे. कोरोनाचा रूग्ण गंभीर असेल तर त्याला सुविधा मिळतात. कोविड हॉस्पिटलसाठी घेतलेल्या रूग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रूग्णांसाठी असणार आहेतयातील 25 टक्के बेड हे जनआरोग्य योजनेसाठी आहेतअसेही त्यांनी सांगितले.

            दवाखान्याने दिलेले बीलशासकीय दरानुसार बिलातील तफावत याबाबत हॉस्पिटलचे प्रशासन ऐकत नसतील तर जिल्हा समितीकडे पाठवावीतअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            डॉ. ढेले म्हणालेजनतेच्या सोयीसाठी सर्व ठिकाणच्या दवाखान्यात आरोग्य मित्रांची नेमणूक केली आहे. दवाखान्यातील खाटांची माहिती नागरिकांनी आरोग्यमित्रांकडून घ्यावी.

            यावेळी प्रांततहसीलदारलेखा परीक्षक यांच्या अडचणी जाणून घेऊन श्री. देशमुखश्री. पांडे यांनीही मार्गदर्शन केले.

           

           

           

           

           

           

           

           

           

           

           

           

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *