👁 9 Views

संशयितांना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

 

            

             

बार्शी नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार डी.एस.कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, तालुका समन्वयक तथा सहायक निबंधक अभय कटके, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.शितल बोपलकर,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, आदी उपस्थित होते.

            श्री.शंभरकर यांनी सांगितले की, कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांची त्याच दिवशी तपासणी करावी. अतिजोखमींच्या संपर्कातील आणि कमी जोखमींच्या संपर्कातील किमान वीस व्यक्तींचे ट्रेसिंग करा. नागरिकांचे सर्व्हेक्षण करा. त्यातून आयएलआय (इन्फ्लूएंजा लाईक इलनेस) आणि सारीची (सिव्हीअर ॲक्यूट रेस्पीरेटरी इलनेस) लक्षणे असणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी करा. त्यामध्ये संशयित आढळणाऱ्या व्यक्तींना होम क्वॉरंटाईन न करता 

            सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अधिकाऱ्यांनी परस्परात सुसंवाद ठेवावा. कोणत्याही यंत्रणेला मनुष्यबळ अथवा साधनसामग्रीची आवश्यकता भासल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी दर दोन दिवसांनी आढावा बैठक घ्यावी, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

              श्री.शंभरकर यांनी जामगांव येथे भेट देवून  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *