👁 11 Views

पंढरीत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात हिंदु-मुस्लिम बांधवांनी मिळुन केली आरती

आज श्रीराम जन्मभुमी असलेल्या आयोध्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. या पार्श्‍वभुमीवर आज पंढरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अडीचशे वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली. होळकर वाड्यातील या मंदिरात अतिशय प्रसन्न मुद्रेतील श्रीराम-लक्ष्मण-सीतामाई यांच्या संगमरवरी मुर्ती आहेत. या मुर्तीसमोरच पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचीही संगमरवरी मुर्ती आहे. गाभारा पुर्णपणे चिरेबंदी असुन हे मंदिर म्हणजे पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट आणि अनमोल ठेवा आहे.   

आज या मंदिरात मोठ्या आनंदाने मुस्लिम समाजाने देखील श्रीरामाच्या आरती सोबतच पांडुरंगाची आरतीही गायली. आणि विठ्ठलाच्या या समतेच्या नगरीत एकात्मता नांदते. असा संदेश दिला. यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार प्रदेशाध्यक्ष तथा शाडो  कॅबिनेटमधील सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे यांनी रामरायाची आरती केली. याप्रसंगी समीर बेंद्रेकर हे मुस्लिम युवक देखील धोत्रे यांच्या समवेत आरती मध्ये सहभागी झाले होते. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे , माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, शाम गोगांव, गणेश पिंपळनेरकर आदी उपस्थित होते.

सदरची आरती अशपाक सय्यद , इब्राहिम बोहरी ,इक्बाल बागवान , समीर बेंद्रेकर , अकबर शेख , नागेश भोसले , दिलीप धोत्रे , ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे , आदित्य फत्तेपूरकर , शाम गोगांव , चंदूकाका दंडवते , गिरीष बोरखेडकर , माधव ताठे-देशमुख , विजय बंटी वाघ यांच्या हस्ते करण्यात आली. 

आरती झाल्यानंतर सर्व उपस्थितानी “जय श्रीराम”असा एकच नारा दिला. त्यापासून सर्व मुस्लिम बांधवांचा होळकर संस्थाच्या वतीने व्यवस्थापक फत्तेपुरकर यांनी सत्कार केला. प्रसंगी फिजीकल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *