👁 13 Views

पंढरपूर सिंहगड मधील विद्युत अभियांत्रिकी विभागात एकदिवसीय ऑनलाईन वेबिनार


पंढरपूर: प्रतिनिधी –  कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात एकदिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. हे वेबिनार उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने दि. १७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार मध्ये गेट परिक्षेची तयारी, आयईएस परिक्षा, विद्युत अभियांत्रिकी विभागातील करिअरच्या संधी अशा अनेक विषयांवर प्रा. माधव शिंदे यांनी ऑनलाईन वेबिनार मध्ये महत्वपूर्ण माहिती दिली.

    विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये १०० हून अधिक विद्यार्थी सह प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा. माधव शिंदे यांनी उत्तरे दिली.

     विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सतत नव-नवीन उपक्रम राबवित आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती व्हावी तसेच शैक्षणिक क्षेत्रात विकास व्हावा यासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले.

हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रा. दत्तात्रय काळेल, प्रा. विनोदकुमार मोरे, प्रा. अभिजीत वाडेकर आदींनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *