👁 11 Views

माजी आमदार कै.सुधाकरपंत परिचारक आणि श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक कै.राजुबापू पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन


सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कै.सुधाकरपंत परिचारक आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कै.राजूबापू पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषि अशा सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या दोघांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही. या दोन्ही नेत्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आमदार श्री भारत भालके यांनी दिली.
               पंढरपूर येथील श्रीसंत तनपूरे महाराज मठामध्ये दि.21.08.2020 रोजी दुपारी 04.00 वाजता ही सर्वपक्षीय श्रध्दांजली सभा होणार आहे. सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व नागरिकांनी या श्रध्दांजली सभेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार श्री भारत भालके यांनी केले.

पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *