👁 10 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये ‘एन.डी.टी. टेस्टींग- मेकॅनिकल इंजिनिअरसाठी नोकरीची एक उत्तम संधी’ या विषयावर वेबिनार संपन्न



पंढरपूर : प्रतिनिधी

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागांतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टूडंट असोसिएशन आयोजित करण्यात आलेल्या करीअर विषयक ऑनलाईन सेमिनार मालिकेत दि. २० ऑगस्ट रोजी ‘नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्टींग- मेकॅनिकल इंजिनिअरसाठी नोकरीची एक उत्तम संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून ‘प्रोफिशियंट एन.डी.टी.’याच्या संस्थापिका संगिता कापोते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनार मध्ये  विद्यार्थ्यांना एन.डी.टी. व वेल्डींग इन्स्पेक्शन याक्षेत्रांत नोकरीसाठी लागणारे ज्ञान व कौशल्य यांची माहिती करून दिली. याबरोबरच त्यांनी भारतातील व परदेशातील कंपनीत काळानुसार झालेला बदल व प्रगती यांची तुलनात्मक रित्या जाणीव करून देत असताना आपला याक्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. याबरोबरच त्यांनी एन.डी.टी. क्षेत्रात नोकरीतील आव्हाने यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. 


        संगिता कापोते ह्या स्वतः भारतातील प्रथम अमेरिकन वेल्डींग सोसायटी प्रमाणित महिला वेल्डींग इन्स्पेक्टर आहेत. त्यामुळे त्यांनी पुरूषांबरोबरच महिलांनाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील नोकरीची एक उत्तम संधी म्हणजे एन.डी.टी.क्षेत्रात असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नोकरीसाठी लागणाऱ्या प्रमाणित कोर्सेसची माहिती दिली.

यादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात लागणाऱ्या कंपनी ट्रेनिंग सुध्दा उपलब्ध करून देण्याचे आवाहन दिले, इच्छुक विद्यार्थ्यांना लाॅकडाऊन दरम्यान प्रोफिशियंट एन.डी.टी. द्वारे ऑनलाईन कोर्सेसमध्ये सहभाग नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली.
हा वेबिनार मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. हृषिकेश देशपांडे, प्रा. अतुल कुलकर्णी यांच्या सह अनेक प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *