👁 9 Views

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2031 अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

         

   मुंबई दि. 3. – महाराष्ट्र शासनाने या अधिसूचनेद्वारे शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या  एक हजार  कोटीं रुपयाच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. राज्य शासनास रुपये एक हजार कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शतीच्या अधीन राहील.  तसेच


राज्य शासनाच्या क्र . एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र . १० / अर्थोपाय 
दिनांक १६ मे २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींचे अधीन राहील .      

       कर्जाचा उद्देश –  कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल .  भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २ ९ ३ ( ३ ) अन्वये कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे .  

      कार्यप्रणाली . – शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँक फोर्ट मुंबई ४०० ००१ द्वारे दिनांक १६ मे २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र. एलएनएफ . १०.१ ९ / प्र.क्र . १० / अर्थोपाय परिच्छेद ६.१ मध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल . 

     अस्पर्धात्मक बिडर्सला प्रदान  – राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ १०.१ ९ / प्र.क्र .१० / अर्थोपाय दिनांक १६ मे २०१ ९ मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार ( सुधारित ) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोख रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल लिलावाचा दिनांक व ठिकाण – भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फ दिनांक ०८ सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या फोर्ट मुंबई येथील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक ०८ सप्टेंबर २०२० रोजी खालीलप्रमाणे संगणकीय प्रणालीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोअर बँकींग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सादर करण्यात यावेत : ( अ ) स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे आहे रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया कोअर बँकीग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत . ( ब ) अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोअर बँकीग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत 

      लिलावाचा निकाल – लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक ० ९ सप्टेंबर२०२० रोजी करण्यात येईल . 

            अधिदानाची कार्यपद्धती यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक ० ९ सप्टेंबर२०२० रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीने बँकर्स धनादेश / प्रदान आदेश डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येईल .

            कर्जरोख्याचा कालावधी कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असेल . रोख्याचा कालावधी हा दिनांक ० ९ सप्टेंबर २०२० रोजीपासून सुरू होईल

        परतफेडीचा दिनांक ० ९ सप्टेंबर२०३१ रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल . व्याजाचा दर अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक  9 मार्च  आणि  9 सप्टेंबर  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल .

 कर्जरोख्याची पात्रता. -शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकींग विनियम अधिनियम १ ९ ४ ९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर ( SLR ) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. सदर कर्जरोखे हे पुनः विक्री – खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या सप्टेंबर 2020 च्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे.


पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *