👁 11 Views

सरकोली येथील श्रीभैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. बिभीषण रणदिवे यांचा सत्कार

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील  श्रीभैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. बिभीषण रणदिवे यांचा सर्व शिक्षक स्टॉप कडून श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. पंढरपूर तालुक्याचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पाहून प्राचार्य पदाचा अतिरिक्त पदभार त्यांना मिळाला आहे.

डिग्री कुठलीही मिळवा पण गर्व करू नये’ असे ब्रीद वाक्य जपणारे डॉ. बिभिषण रणदिवे हे समाजामध्ये वावरताना सामाजिक बांधिलकी जपत व सर्व जाती धर्मांना घेऊन समाजाच्या विकासासाठी लढणारे म्हणुन ओळखले जातात. सध्या ते प्राचार्य पदी रूजू झाले आहेत. यावेळी  सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते .

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शाळेत उपस्थित नसले तरी सर्व विद्यार्थ्यांना गुगल अॅप,मीट अॅप,चिली मिली कार्यक्रम, शिक्षक- विद्यार्थी ग्रुप करून सर्व विद्यार्थ्यां शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्यात आले.

 5 वी व 8वी शिष्यवृत्ती ,8 वी NMMS परीक्षा व 10 वी NTS परीक्षा यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना सर्व शिक्षकांना देण्यात आल्या.याबाबतची कार्यवाही त्वरित चालू करण्याचा त्यांचा मानस आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे नियोजन व कार्यवाही करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेण्याबाबत डॉ.रणदिवे नेहमी आग्रही व सतर्क असतात.


पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *