○ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण समिती कडून सामाजिक उद्योजकता, स्वच्छता, प्रतिबद्धतेसाठी निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद सन २०१९-२० मध्ये शिक्षण मंञालयाच्या नोडल एजन्सी कडून घेण्यात आलेल्या स्वच्छता क्रमवारीत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण समिती कडून सामाजिक उद्योजकता, स्वच्छता, प्रतिबद्धता विभागीय संस्था म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. करांडे यांनी दिली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
२०१९ मध्ये एआयसीटीई यांनी आयोजित केलेल्या “स्वच्छ आणि स्मार्ट” कॅम्पसच्या स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने भाग घेतला होता. गेल्या वर्षी एआयसीटीई समितीने “स्वच्छ व स्मार्ट” कॅम्पस पुरस्कारासाठी पंढरपूर सिंहगड कॅम्पसला भेट दिली होती. त्या अनुषंगाने पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाला भारत सरकारच्या शिक्षण मंञालयाकडून चालू वर्षीच्या स्वच्छता कृती योजनेत निवड झाल्याने सामाजिक कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने यापुर्वी अनेक सामाजिक विविध उपक्रम राबविले आहेत.
भारत सरकारच्या या कृती योजनेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची सामाजिक उद्योजकता, स्वच्छता आणि ग्रामीण प्रतिबद्धता विभागीय संस्था म्हणून निवड झाली असुन यामध्ये महाविद्यालय व कृती समिती सामाजिक उपक्रम राबविणार आहेत. यामध्ये खेड्यातील विकासासाठी गावे दत्तक घेण्यात येणार आहेत, स्वच्छतेसाठी प्रयत्न सत्यापित करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण शिक्षण समिती कडून सामाजिक उद्योजकता, स्वच्छता आणि ग्रामीण प्रतिबद्धता विभागीय संस्था म्हणून निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)


