👁 13 Views

राज्यपालांच्या हस्ते स्मशानभूमी कर्मी, स्वच्छता कामगार, भाजी विक्रेते, पोलीस यांसह कोविड योद्ध्यांचा सत्कार


            मुंबई, दि. 10 : कोरोना उद्रेकानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवाची पर्वा न करता आपल्या कार्याच्या माध्यमातून अविश्रांत सेवा करणाऱ्या डॉक्टर्सपोलीस अधिकारी यांसह जनसामान्य कोविड योध्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


            स्पंदन आर्ट्स संस्थेने आयोजित केलेल्या कोविड योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. जलील परकारडॉ. शशांक जोशीपोलीस उपायुक्त प्रणय अशोकपोस्ट मास्तर मुंबई सर्कल स्वाती पाण्डेपोलीस निरीक्षक गजानन काब्दुलेयोगशिक्षिका सुनैना रेखी यांसह स्मशान भूमी व कब्रस्तान कर्मचारीस्वच्छता कर्मीपोस्टमनफळ-भाजी विक्रेतेमोक्षवाहिनी चालक यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

            भारतात यापूर्वी प्लेगसारखी संकटे येऊन गेली आहेत. परंतु भारतातील लोकांमध्ये सेवा परमो धर्म:’ हा संस्कार रुजलेला आहे. त्यामुळे परस्परांना मदत करून लोकांनी वेळोवेळी संकटांवर धैर्याने मात केली आहे. गेल्या पाच महिन्यात कोरोना योद्ध्यांनी समर्पण भावनेनी केलेली सेवा ही खरी ईशसेवा असल्याचे सांगून सर्वांनी आगामी काळात सेवा आणखी वाढवावी अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.

            आमदार आशिष शेलार यांनी कोरोना योद्ध्यांच्या सत्कारामागची भूमिका सांगितली तर बांद्रा हिंदू असोसिएशनचे अजित मन्याल यांनी आभार प्रदर्शन केले.

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *