पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने खासदार राजकुमार धूत यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे 50 लाख खर्च करून गॅसदाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले होते. यासाठी आमदार प्रशांतराव परिचारक व शिवसेना चे नेते जिल्हा परिषद सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून खासदार राजकुमार धूत यांच्याकडे गॅसदाहिनीच्या कामासाठी खासदार निधी मिळण्याबाबत मागणी केली होती, त्यानुसार खासदार राजकुमार धूत यांनी 50 लाख रुपये निधी नगरपरिषदेस दिला होता, त्यामध्ये नगरपरिषदेने स्वनिधी घालून ही गॅसदाहिनी बांधली आहे.
आज पंढरपूर शहरातील व तालुक्यातील मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ही गॅस दाहिनी कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. साधनाताई नागेश भोसले यांनी दिली. आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर या गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर ,आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे व सफाई कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे हे उपस्थित होते
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 (पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)



