👁 10 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “पायथाँन प्रोग्रामिंग, गेम डिझायनिंग युझिंग पायथाँन” या विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील अणुविद्युत व दूरसंचार विभागात ऑनलाईन पद्धतीने “पायथाँन प्रोग्रामिंग गेम डिझायनिंग युझिंग पायथाँन” या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


  सद्या संपुर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनेसंचार बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सर्व शाळा व काॅलेज यांना सुट्टी आहे. या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तसेच अभ्यासाव्यतिरीक्त विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती व्हावी यासाठी आयईटीई असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सोनिया नवले यांनी पायथाँन प्रोग्रामिंग गेम डिझायनिंग याविषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला नोंदविला.

   या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. गणेश लिंगे यांनी केले. अणुविद्युत व दूरसंचार विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अणुविद्युत व दूरसंचार विभागातील प्रा. अमोल जगदाळे सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *