👁 12 Views

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला घातली कांद्याची माळ! कांद्याची निर्यात बंदी केल्याने जिल्हा युवक काँग्रेसचे पंढरपूरात आंदोलन

 


पंढरपूर –
आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना आणखी एक धक्का बसला असून केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यालाच संपवण्याचा डाव आखला आहे. हे केंद्र सरकार शेतकरी बांधवांचे नसून व्यापारी धार्जिणे आहे. नुकसानीच्या नावाखाली सध्या केंद्र सरकारने अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावला असून आता त्यांचे लक्ष शेतकर्‍यांकडे गेले असून एकदा का शेतकरी संपला की संपूर्ण देशावर फक्त व्यापाऱ्यांचे राज्य निर्माण होणार असून या माध्यमातून गोरगरीबांची पिळवणूक करण्याचा डाव केंद्रातील भाजपा सरकारचा असल्यामुळे याच्या निषेधार्थ पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या फोटोला कांद्याची माळ घालून आज पंढरपूर येथील श्री संत गाडगे महाराज मठासमोर स्टेशन रोड येथे सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे , सोमनाथ आरे, दिलीप जाधव, सुहास भाळवणकर, द बडवे, मधुकर फलटणकर, अर्जुन देवकर, मिलिंद आढवळकर, देवानंद ईरकल, संतोष ताठे, कल्याण घुले, संदीप गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


तसेच या आंदोलनात नरेंद्र मोदी मुर्दाबाद व केंद्र सरकार हाय हाय या घोषणा देऊन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. 

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव – नितीन नागणे 
केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यालाच संपवण्याचा डाव आखला आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना आणखी मोठ्या अडचणीत ढकलून त्यांना संपविण्याचा डाव असून  अशाप्रकारे हे सरकार व्यापारी धार्जिणे आहे असा आरोप सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *