कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील संगणक विभागात “इंटरनेट ऑफ थिंग्स” या विषयावर ऑनलाईन गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते. हे गेस्ट लेक्चर उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाविद्यालयातील संगणक विभागातील आय.ई.आय. स्टुडंट्स चाप्टर यांच्या अखत्यारीत शुक्रवार, दि. २५/०९/२०२० रोजी “इंटरनेट ऑफ थिंग्स” या विषयावर ऑनलाईन गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये रणजिति कोळकर व संकेत साळवी (दोघेही सहाय्यक व्याख्याता तसेच संशोधन विद्वान, एन.आय.टी.के. सुरतकल) यांनी विद्यार्थ्यांना गूगल मीट ऍप च्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यान दिले. तसेच आय.ओ.टी. मधून लहान प्रकल्प कसे बनवावे याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. कोरोना महामारीच्या काळातही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्याख्यानाचा घरी बसून आपल्या मोबाइल द्वारे लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील आय. ई. आय. स्टुडंट्स चाप्टर चे अड्वायजर प्रा. एस. व्ही. पिंगळे व समन्वयक प्रा. आर. ए. टाकळीकर व संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले अशी माहिती संगणक विभाग प्रमुख प्रा. एन. एम. सावंत यांनी दिली.
या ऑनलाईन गेस्ट लेक्चर मध्ये सहभागी तज्ज्ञांचे स्वागत विभागप्रमुख प्रा. एन. एम. सावंत व प्रा. एस. व्ही. पिंगळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. ए. टाकळीकर यांनी केले, तर तज्ज्ञांचे आभार प्रा. व्ही. जी. चव्हाण यांनी मानले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी



