👁 11 Views

मराठा महासंघाच्या वतीने कै. अण्णासाहेब पाटील यांची ८७ वी जयंती विविध उपक्रमातून उत्साहात साजरी

    

पंढरपूर(प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पंढरपुरात माथाडी कामगारांची आराध्यदैवत व मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची 87 वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जयंतीच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण व शहराध्यक्ष अमोल पवार यांनी दिली.

मराठा समाजासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले ती थोर व्यक्ती काही अण्णासाहेब पाटील यांची आज 87 वी जयंती च्या निमित्ताने मराठा महासंघाच्या वतीने येथील तांबड धर्मशाळा येथे कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्हेरी चे डॉक्टर प्रशांत पवार हे होते प्रारंभी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला यावेळी समाजात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आला.

प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत पवार यांना नुकताच भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर आवरणे देशात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते यासाठी मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना ते म्हणाले की बहुजन समाजातून आलेल्या लोकांकडे असे पाण्याचा समज होता की हा समाज कष्टकरी कुणबी शेती करणारा समाज म्हणून पहिले जात होते परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही मराठा समाजातूनही उच्चशिक्षण घेणारे अनेक जण आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज माझा सन्मान देशात प्रथम क्रमांकाने झाला हा सन्मान माझा वैयक्तिक नसून संपूर्ण समाजाचा आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले काही अण्णा साहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने सध्या संपूर्ण देशात कोरोना महामारी वाढत आहे त्यामुळे रक्ताची कमतरता सर्वत्र भासू लागल्याने जयंती निमित्ताने रविवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते चार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना भेटवस्तू दिली जाणार आहे समाजाच्या कामासाठी व समाज हितासाठी प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी केले त्याच बरोबर कोरणा सारख्या महामारी मध्ये आपला जीव धोक्यात घालून ज्यांनी कोरोनाव्हायरस म्हणून काम केले अशा अधिकाऱ्यांचा डॉक्टरांचा सन्मान मराठा महासंघाच्या वतीने घेण्यात येणार आहे. मराठा महासंघाच्या वतीने अनेक सामाजिक हिताचे उपक्रम राबविण्यात आले यामध्ये हे वृक्षारोपण आधी कार्यक्रम घेण्यात आले होते जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला अध्यक्ष डॉक्टर संगीता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष अमोल पवार यांनी केले. यावेळी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष  सचिन गंगथडे,जिल्हा सचिव गुरूदास गुटाळ,पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव,माळशिरस तालुकाध्यक्ष शामराव गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे,शहराध्यक्ष अमोल पवार, भाऊसाहेब पवार,शहर संघटक काका यादव,महिला आघाडी तालुका अध्यक्षा प्रा रजणीताई जाधव,शहराध्यक्ष डॉ संगीता पाटील,शहर उपाध्यक्षा अश्विनी साळुंखे,शहर संघटक रतन थोरवत,कु स्वरा अनपट,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष  प्रणव गायकवाड,विनायक पडवळे,सचिन थिटे,पांडुरंग शिंदे,महेश माने यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.  

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 

संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *