👁 12 Views

स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे नाइपर परीक्षेत दैदिप्यमान यश

 पंढरपूर- फार्मसीच्या उच्च शिक्षणासाठी म्हणजेच पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट यासाठी आवश्यक असणारी नाइपर (नॅशनल इन्स्टिटयूट फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च) ही परीक्षा संपूर्ण भारतात होत असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नायपर) ही भारतातील राष्ट्रीय स्तरावरील औषधी विज्ञान संस्था आहे. भारत सरकारने नाइपर ला राष्ट्रीय महत्त्व असणारी संस्था म्हणून घोषित केले आहे. ही संस्था औषधनिर्माण विभागाच्या  अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहे. केवळ जीपॅट (ग्रॅज्युएट फार्मसी अँपटीट्युड टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थीच ही परीक्षा देऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर  स्वेरी फार्मसीच्या आश्लेषा माळीसोहेल इनामदारस्वप्ना सावंतशितल नरळे व पल्लवी नरळे या पाच विद्यार्थ्यांनी  दैदिप्यमान यश मिळवले.

          स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना २००६ साली झाली. प्रत्येक वर्षी अभियांत्रिकी प्रमाणेच  फार्मसी मधूनही नवीन विक्रमांची नोंद होत आहे. यावेळी एम.एस.एम.फार्मसीएम.टेक इन फार्मसी अशा फार्मसीच्या उच्च शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असणारी नायपर-जेईई’ परीक्षेत स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यामध्ये आश्लेषा जगन्नाथ माळी ( रँक-६८६)सोहेल इसाक इनामदार (रँक-९३९) स्वप्ना लहू सावंत (रँक-१४०५)शितल विजय नरळे (रँक-१८४९)पल्लवी अशोक नरळे (रँक-१९०५) यांनी यश मिळवले. जीपॅट व नायपर परिक्षा क्रॅक केल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप फायदे होतात. जीपॅट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एम. फार्मसीला प्रवेश घेतल्यानंतर शासनाकडून दरमहा  बारा हजार रुपये स्टायपेंड मिळतो  जीपॅट व नायपर परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नायपर संस्थाआयसीटी कॉलेज ऑफ फार्मसीमुंबई व इतर शासकीय महाविद्यालयात एम.फार्मसीसाठी प्रवेश मिळतो. अनेक विद्यापीठामध्ये पीएच.डी. ची नोंदणी करण्यासाठी जीपॅट व नायपर उत्तीर्ण विद्यार्थांना पीएच.डी. पूर्व परिक्षेमध्ये सूट आहे व शैक्षणिक संस्था आणि एमएनसी फार्मा कंपन्या जीपॅट पात्र उमेदवारांना प्राधान्य देतात. त्यामुळे या परीक्षांचे महत्व वाढले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे इतर पदाधिकारीविश्वस्तस्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्यबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मनियार तसेच इतर प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले. 

 छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगेफार्मसी लोगो, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार आणि नाइपर या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी. 

 >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 

संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *