पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ३ विद्यार्थ्यांची “जयश्री पाॅलिमर्स” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयातील वार्षिक परीक्षेचा निकाल, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध उद्योजक शिबिरे आयोजित करण्यात येतात, विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालनादेण्यासाठी “प्रकल्प धारितशिक्षण” दिले जाते. याचा फायदा प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना खुप मोठ्या प्रमाणात होत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थांची मुलाखतीतून निवड होत आहे. सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी हा गुणवत्तेच्या आधारावर आज सर्वञ निवडला जात आहे.
Advet.
……………
महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील वैभव बडवे-महाजन, सचिन पालवे आणि जुनेद शेख या ३ विद्यार्थ्यांची “जयश्री पाॅलिमर्स” या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली आहे.
“जयश्री पाॅलिमर्स” या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. भारत आदमिले, राजाराम राऊत सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


