👁 10 Views

सिंहगडच्या आकाश खपाले यांची “व्होडाफोन” कंपनीत निवड

 
पंढरपूर : प्रतिनिधी     कोर्टी (ता. पंढरपूर) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील आकाश खपाले या विद्यार्थ्यांची नामांकित “व्होडाफोन” कंपनीत मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.       


        पुणे सिंहगड इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या मुलाखतीतून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील आकाश खपाले या विद्यार्थ्यांची “व्होडाफोन” कंपनीत निवड झाली असुन कंपनीत कडून ३.५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
  “व्होडाफोन” ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देत आहे.
      या निवडी दरम्यान “व्होडाफोन” कंपनी कडून घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक व तांत्रिक चाचणी घेण्यात आली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त, समर्पक, योग्य व अचूक उत्तरे दिल्यामुळे कंपनीचे अधिकारी समाधानी झाले. “व्होडाफोन” कंपनीत आवश्यक असलेले गुण पंढरपूर सिंहगड मधील विद्यार्थ्याकडे दिसून आले. विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी पंढरपूर सिंहगड सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणप्रणाली, उच्च शिक्षित व शिस्त प्रिय अनुभवी प्राध्यापक, जगातील नामवंत कंपनीत विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोक-या, पंढरपुर सिंहगडची विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल, सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम या सर्व गोष्टीमुळे पंढरपुर सिंहगडला नॅशनल अॅक्रिडिटेशन अ‍ॅण्ड असेसमेटं कौन्सिल म्हणजे नॅक समिती कडून “ए” ग्रेड मिळालेल्या कोर्टी (ता. पंढरपूर) महाविद्यालयांची प्लेसमेंट मध्ये दमदार वाटचाल आहे. महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चा  स्वतंत्र विभाग असून भविष्यात जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना नामंकित व उत्कृष्ट कंपनीत नोकरी देण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रत्नशील असणार आहे.
       “व्होडाफोन” या कंपनीत निवड झालेल्या आकाश खपाले या विद्यार्थ्यांची  पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्युटचे प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पिंताबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. सुर्यकांत पाटील, राजाराम राऊत,  प्रा. श्रीनिवास गंजेवार सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Advet.  


……………

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *